आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dissatisfied With Probe Panel, Gwalior Judge Moves SC

हायकोर्ट जजवर लैंगिक शोषणाचा आरोप करणा-या ज्युनिअर जजची सुप्रीम कोर्टात धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित)
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील हायकोर्टाच्या जजवर लैंगिक शोषणाचा आरोप करणा-या महिला सत्र न्यायाधीशांनी या प्रकरणी होणा-या चौकशीबाबत असमाधान व्यक्त करत, नवीन समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. दोन मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्टाच्या एका न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हायकोर्टाच्या जजवर लैंगिक शोषणाचा आरोप करत या महिला न्यायाधीशांनी राजीनामा दिला होता.

खळबळजनक खुलासा
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या महिला न्यायाधीशांनी आरोपीवर त्यांना एकटे भेटण्यासाठी दबाव आण्याला आरोप लावला आहे. त्यांनी सांगितले की, बदलीनंतर ते (आरोपी जज) म्हणाले होते, तुम्ही माझ्या बंगल्यावर एकदाही एकट्या आल्या नाही. माझे न ऐकण्याची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे. आता पुढे पाहा मी तुमचे करिअर कसे संपवतो.

मला संधी दिली नाही, म्हणून या प्रकरणी तक्रार दाखल करता आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, नियमांनुसार फक्त हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशच चौकशी करू शकतात. जर ते समाधानी असतील तर त्यांना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर सरन्यायाधीशच त्यासंदर्भात निर्णय घेत असतात.

मुख्य न्यायाधीशांना नव्हती भेटायची इच्छा
या प्रकरणी तक्रार घेऊन पीडित महिला मध्य प्रदेशच्या मुख्य न्यायाधीशांकडे गेल्या होत्या, पण त्यांची भेटण्याची इच्छा नव्हती. तसेच या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांच्या माध्यमातून तक्रार व्हायला हवी होती. पण जिल्हा न्यायाधीशच यात सहभागी होते, असेही त्या म्हणाल्या.
काय होते प्रकरण?
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठातील न्यायाधीश एस.के.गंगेले यांच्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश असलेल्या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पीडितेने गंगेले यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या न्यायाधीशाने माझ्या 16 वर्षीय मुलीसमोर 'तुझ्या कामापेक्षा तू किती तरी अधिक सुंदर आहेस..’ अशी शेरेबाजी केली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर पुढे मला खालून वरपर्यंत न्याहाळत माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाले, 'मला तुला जवळून पाहायचे आहे.' हा प्रसंग माझ्या मुलीसाठी एक धक्का होता. मी न्यायाधीश महोदयांना त्यांचे हे वागणे योग्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची ती वागणूक अतिशय आक्षेपार्ह्य होती. त्या सोहळ्यातून मी रडतच बाहेर पडले.' असे आरोप त्यांनी केले होते.