आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Division Over Bedi In BJP, Satish Upadhyaya Supporters Give Slogan Against Shah

बेदींवरून भाजपत वाद, सतीश उपाध्याय समर्थकांची अमित शहांविरोधात घोषणाबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून किरण बेदींचे नाव जाहीर करताच भाजपमधील दुफळी समोर आली. भाजपच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयात या निर्णयाला विरोध दर्शवला. ‘पॅराशूट सीएम नहीं चलेगा’ अशी घोषणाबाजी केली.

सोमवारी भाजपने दिल्लीत ७० पैकी ६२ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात उपाध्याय यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. उपाध्याय यांनी समर्थकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या बाबी क्षणिक आहेत. कार्यकर्ते लवकरच शांत होतील, असे आश्वासन सतीश उपाध्याय यांनी दिले. मी स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. किरण बेदींना दिल्लीत विजय मिळवून देणे व केजरीवालांना दिल्लीपासून दूर ठेवण्याचे आमचे एकमेव लक्ष्य असल्याचे उपाध्याय म्हणाले.

ओखलातून तिकीट न मिळाल्याने भाजप नेते धीरसिंग विधुडी यांनी समर्थकांसह पार्टीचा राजीनामा दिला आहे. रोहिणी येथील जय भगवान यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचा सूर आहे. दिल्ली भाजपच्या उपाध्यक्षा शिखा राय यांनाही उमेदवारी दिली नाही. २०१३ मध्ये कस्तुरबानगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती.

पुढे वाचा रोड शोत रुग्णवाहिका अडकली; अर्ज भरता आला नाही केजरीवाल यांना...