आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूजी घोटाळा : आजपासून आरोपींचे जबाब नोंदवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारपासून आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात करणार आहे. आरोपींमध्ये माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांचा समावेश आहे.

विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी त्याआधी 17 आरोपींना 824 पानांतून 1718 प्रश्न विचारले होते. या आरोपींमध्ये राजा यांच्यासह द्रमुक खासदार कनिमोझी तसेच अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या तीन अधिकार्‍यांचे जबाब सोमवारी नोंदवण्यात येणार आहेत. एस्सार ग्रुप आणि लूप टेलिकॉमच्या प्रवर्तकांचाही जबाब नोंदवला जाईल. एस्सार आणि लूप टेलिकॉमचा सहभाग असलेल्या प्रकरणातील आठ आरोपींना 645 प्रश्न विचारण्यात आले आहेत. 2008 मध्ये टूजी परवाना मिळवण्यासाठी संबंधितांनी लूप टेलिकॉमचा वापर करून दूरसंचार खात्याची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.