आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी छळाची खोटी तक्रार करणार्‍यांना शिक्षा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हुंडाविरोधी कायद्याच्या दुरुपयोगाची वाढती प्रकरणे पाहता त्यात कठोर बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. खोटे आरोप करणार्‍यांना आता दंड किंवा शिक्षा करण्याची तरतूद केली जाऊ शकते.
हुंडाविरोधी कायदा अधिक सक्षम करण्याचा महिला व बालकल्याण मंत्रालयाचा प्रयत्न आहे. हुंडाविरोधी कायदा अधिक कठोर व्हावा यासाठी त्यातील तरतुदी आणि व्याख्या व्यापक करण्यात येणार आहे. हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग होत असून, महिलांकडून पती व सासरच्या मंडळींना वेगवेगळ्या कारणांवरून गोवले जात आहे. अशा तक्रारी विभागाकडे येत आहेत, असे एका अधिकाºयाने सांगितले. आरोप खोटे निष्पन्न झाल्यास केस बंद केली जाते. परंतु महिलेला शिक्षा मिळायला हवी, असेही या अधिकाºयाने म्हटले.
सुप्रीम कोर्टाकडूनही चिंता
हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात तत्काळ अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च् न्यायालयाने याच महिन्यात पोलिसांना दिले होते. आरोपांची पुष्टी झाल्यानंतरच कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट करून न्यायालयाने कायद्याच्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली होती.