आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : देशभरात एकच मोबाइल सर्कल करण्याचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - आगामी काळात मोबाइल सेवा आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. विविध राज्यांनुरूप सर्कलव्यवस्था संपुष्टात आणून देशभरात एकच सर्कल बनवण्याचा प्रस्ताव मोबाइल ऑपरेटरांनी दूरसंचार विभागाला दिला आहे. सध्या नवे दूरसंचार धोरण बनवण्यासाठी काम सुरू असून त्यासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे. अशा वेळी ऑपरेटर्सनी हा प्रस्ताव दिल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे.  
 
ऑपरेटरच्या मते, ग्राहकांना सध्या संपूर्ण भारतभरात सर्वत्र एकच क्रमांक वापरता येतो. त्यामुळे ऑपरटेरांनाही ‘एक देश-एक सर्कल-एक नेटवर्क’ सुविधा मिळायला हवी. यामुळे प्रत्येक सर्कलसाठी कोट्यवधींचा खर्च करावा लागणार नाही. कॉल ट्रान्सफरचा पैसा वाचेल व अनेक तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या खर्चाचीही बचत होईल. त्यावर दूरसंचार सचिवांनी विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...