आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: सीओओंऐवजी चीफ डिलाइट ऑफिसर, कॉर्पोरेट कंपन्यांत आगळी पदनामे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मॅनेजमेंट ग्रॅज्युएट रीटा नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली. एचआर ऑफिसर शोधताना चकितच झाली. येथे एचआर आॅफिसरऐवजी ‘चीफ डिलाइट ऑफिसर’ असल्याचे तिला समजले.
दुसरा किस्सा... एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनिअर म्हणून वरुणचा पहिलाच दिवस. काम कुठून सुरू करावे, याचे त्याला टेन्शन आलेले. अशात एक सद्गगृहस्थ अवतरले! स्वत:ची ‘चीफ डिलाइट ऑफिसर’ अशी ओळख करून देत म्हणाले, टेन्शन कायको लेने का? चल काही तरी गंमतजंमत करू, कामबिम तर होतच राहील.

तर.. ही आहेत उदाहरणे आजच्या क्रिएटिव्ह कॉर्पोरेट कल्चरची. जेथे सीईओ, सीओओसारख्या उगा टेन्शन आणणाऱ्या गंभीर पदनामांना चटपटीत नावे दिली जात आहेत. नेहमी टार्गेटच्या टेन्शनमधील कॉर्पाेरेट वातावरण हलके करणे, बॉस व ज्युनियरमध्ये ताळमेळ बसवणे हे त्यामागील हेतू आहेत. ‘चीफ गीक ऑफिसर’, ‘चीफ ट्विटिंग ऑफिसर’ व ‘हेड ऑफ फायर फायटिंग’ ही काही उदाहरणे. तसे पाहता हा ट्रेंड १९९० च्या दशकात डॉटकॉम धमाक्यातच सुरू झाला. आता तो पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. विशेषकरून नवनव्या स्टार्टअप कंपन्या अशी पदनामे देत आहेत.इन्फाेसिसमध्ये बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सचे माजी प्रमुख आशिष मेहरांनी नुकतीच आपली ‘अँटवर्क्स’ ही स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. त्यांचे पद आहे ‘चीफ एव्हरीथिंग ऑफिसर’. ते म्हणाले, पारंपरिक पदे अहंकार वाढवतात. परंपरा मोडीत काढून निर्माण केलेली ही पदे कार्यालयीन एकसुरीपणा घालवण्यास मदत करतात.स्मार्टप्रिक्स या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफाॅर्म कंपनीत एचआर ऑफिसरला ‘चीफ डिलाइट अॉफिसर’ संबाेधले जाते. लोकांशी संपर्क साधणे, टीम बनवणे व दबाव कमी करून आनंददायी वातावरण तयार करणे हे त्याचे काम आहे.