आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी FOCUS : साखरेचे खाणार त्याला केंद्र सरकार तारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद, नवी दिल्ली - ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी फेडण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखानदारांना ६००० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादकांची थकबाकी फेडण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा काही प्रमाणात फायदा होणार आहे. हे बिनव्याजी कर्ज अनुत्पादक असल्याची टीका इस्माने केली आहे.
का वाढतेय थकबाकी ?
{केंद्र सरकार प्रत्येक हंगामात उसासाठी एफआरपी (फेअर अँड रेम्युनेरेटिव्ह प्राइस) निश्चित करते, तर काही राज्य सरकारे उसासाठी वेगळे दर ठरवतात. यातील फरक वाढल्याने थकबाकी फुगते.

{गेल्या चार वर्षांत देशातील मागणीपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले. अशीच स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर राहिली. यामुळे साखर उद्योगात रोख पैशांचा ताण आला. त्यातून थकबाकी वाढली.

साखरेचे कडू गणित
२१,००० कोटी कारखानदारांकडील थकबाकी
३८०० कोटी थकबाकी महाराष्ट्रातील कारखानदारांकडील
१५०० कोटी बिनव्याजी कर्जाचा महाराष्ट्राला मिळणारा वाटा
कर्जाचा डोंगर झाला तिप्पट :
देशातील साखर उद्योगाच्या कर्जात पाच वर्षंात तीनपट वाढ झाली आहे.
२०१२-१३ - ३६,६०१ कोटी
२००७-०८ - ११,४४३ कोटी

महाराष्ट्र अव्वल
देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब. साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. यंदा महाराष्ट्रात १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
उत्पादन खर्च जास्त; साखरेच्या किमती कमी
~२५ ते २८ रु. एक किलो साखर उत्पादनाचा खर्च
~२२ रु. घाऊक बाजारातील साखरेच्या किमती
~२२० रु.प्रतिक्विंटल ऊस केंद्राने ठरवलेली एफआरपी
२५% कारखान्यांचा हंगाम धोक्यात
देशातील ५०० पैकी २५ टक्के कारखाने कर्जाच्या डोंगरामुळे ऑक्टोबर २०१५ पासून सुरू होणाऱ्या हंगामात गाळप करू शकणार नाहीत. यंदाच्या हंगामात (२०१४-१५)मध्ये देशात २६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) वर्तवला आहे.
{देशभरातील साखर कारखाने : ५००
{महाराष्ट्रातील कारखाने : १७८ (सहकारी : ९९, खासगी : ७९)
{यंदा गाळप केलेले कारखाने : १४२

{एफआरपीनुसार दर दिलेले
राज्यातील कारखाने : ०५
यंदा बंद असलेले कारखाने : ३६
शेअर्स वधारले
मुंबई शेअर बाजारात साखर कंपन्यांचे शेअर्स वधारले.
बातम्या आणखी आहेत...