आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आली होळीः सल्‍लू मियां, आता लग्‍न करुन काय करणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आली रे आली होळी आली.... सप्तरंगांची उधळण करणारी होळी आली.. काहीही असो, प्रत्‍येकजण होळीच्‍या रंगात रंगू लागला आहे. होळीच्‍या रंगात रंगुन मनातील हेवेदावेही दूर करण्‍याची एक संधी यानिमित्ताने चालून येते. वर्षभरात अनेक गोष्‍टी अशा घडतात, ज्‍यामुळे मनावर हेवेदाव्‍यांचा काळा रंग वरचढ ठरू पाहतो. तेव्‍हा होळीच्‍या रंगांनी हा रंग धुवुन काढायचा असतो.

मग जर हा रंग धुवुन काढायचाच आहे तर आपण कायम आघाडीवरच असतो. महागाईवर मनमोहनी मौन असो किंवा सल्लू मियांच्‍या लग्‍नाचा मुद्दा, सचिन खेळला तर प्रश्‍न तो खेळला नाही तरीही प्रश्‍नच... एकूणच अशा अनेक प्रश्‍नांनी मनात घर केलेले असते. लाखो तक्रारी आणि प्रचंड रोष मनाला त्रस्‍त करतो.

होळीची नशा आणि भांग रंगाची रंगत आणखी वाढवते. तेव्‍हा तर ओबामा, ठाकरे, दिग्‍गीराजा असो किंवा काटजू, आम्‍ही कोणापेक्षा कमी नसतो. आणि आपण कोणी पीएम तर नाही की तोंड उघडण्‍यासाठी सुपर पीएमची परवानगी लागते.

तर मग मित्रांनो काढा पिचकारी आणि साजरी करा अशी ही सप्तरंगांची धळण करणारी होळी. धूम आणि मस्‍तीमध्‍ये कोणत्‍याही हस्‍तीला विचारा असा प्रश्‍न जो तुम्‍ही इतर वेळी विचारु शकणार नाही.