Home »National »Delhi» Dm Analysis On Presidential Candidate And BJP Politics

DvM Analysis: राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा मोदींचा मास्टरस्ट्रोक, ही आहेत 5 खरी कारणे...

दिव्य मराठी वेब टीम | Jun 20, 2017, 09:47 AM IST

  • DvM Analysis: राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा मोदींचा मास्टरस्ट्रोक, ही आहेत 5 खरी कारणे...
नवी दिल्ली -सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावे दलित चेहरा समोर आणणे हा मोदींचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. या उमेदवारीबरोबरच पीएम नरेंद्र मोदींनी केवळ आपल्या पक्षाची दलित विरोधी छवी मिटवली नाही, तर पक्षात चालणाऱ्या जुने आणि नव्या नेत्यांच्या दुफळीला सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले आहे. या उमेदवारीमुळे भाजपला दलितविरोधी म्हणणाऱ्या विरोधकांचे तोंड दाबले गेले. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वेळी राष्ट्रपती व्ही.व्ही गिरी यांच्या बाबतीत रबरी शिक्का हा वाकप्रचार रूढ झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
#1 - 2019 ची लोकसभा निवडणुकीपेक्षा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजप दलित विरोधी नाही असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. हा निर्णय म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मोदींनी लावलेला राजकीय षटकार आहे.
#2 - नुकतेच झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशानंतर मोदींनी मुख्यमंत्री पदासाठी अचानक योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आणले. त्यामुळे, विरोधकांनी अवघ्या रात्रीतच भाजप दलितविरोधी असल्याचे वातावरण तयार केले. केवळ यूपीतच नव्हे, तर देशभर भाजप दलितविरोधी असल्याचा प्रचार मायावतींसह अनेक दिग्गज नेत्यांनी सुरू केला. अशात सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पदासाठी मोदींनी दलित चेहरा पुढे आणून विरोधकांचे तोंड बंद केले आहेत. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देऊन भाजप आपली दलितविरोधी प्रतिमा मिटवण्यासोबतच यूपीत मायावती आणि त्यांच्यासारख्या इतर दलित नेत्यांच्या मतपेट्या सुद्धा हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे.
#3 - भाजपमध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य पक्षात असे दोन गट असल्याचे कुणाकडूनही लपलेले नाही. राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर होणार त्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी दिल्लीच्या अशोक रोडवर लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती करा, या मागणीचे पोस्टर्स झळकले होते. मात्र, पीएम मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याच्या अवघ्या 2 तासांपूर्वी सर्व पोस्टर्स फाडायला लावले. त्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी अशा दोन्ही दिग्गज नेत्यांना बगल देत कुठेही चर्चेत नसलेले रामनाथ कोविंद यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले.
#4 - एनडीएने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची निवड जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. अशात मोदींनी आपल्या सरकारचे कामकाज आणखी सुकर करण्यासाठीचा मार्ग मोकळा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पीएम मोदी आणि शहा यांच्या गटाने अडवाणी किंवा जोशी यांना उमेदवारी दिल्यास आणि ते निवडून आल्यास मोदी सरकारच्या कायदे मंजुरीचा मार्ग खडतर होण्याची शक्यता होती. सरकारचा कुठलाही कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय (काही वेळा पूर्वसंमती) शक्य नाही. अशात भाजपमधील स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य पश्चात गटांचा वाद जगजाहीर होण्याची भिती होती. त्यामुळे, मोदींनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला उमेदवारी देऊन मास्टर स्ट्रोक लावला आहे.
#5 -भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला जवळपास सर्वच घटकपक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दलित चेहरा असल्याने एखाद्या पक्षाकडून विरोध झाल्यास त्या पक्षाचा दलित विरोधी म्हणून प्रचार होऊ शकतो. अशात उर्वरीत घटक पक्ष सुद्धा भाजपची साथ देतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही. तरीही रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेला सुद्धा विश्वासात घेऊ असे आश्वस्त केले. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेससाठी दलित चेहऱ्याला आव्हान देणारा उमेदवार घोषित करणे तारेवरची कसरत ठरणार आहे. त्यातही बिगर एनडीए आणि बिगर यूपीए घटक पक्षांच्या मतदानाचा आकडा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 13 टक्के आहे. हे 13 टक्के मिळवल्यास भाजपला काँग्रेस सुद्धा आव्हान देऊ शकणार नाही.

Next Article

Recommended