आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत द्रमुकचा गोंधळ तर तृणमूलचा यूपीएला मुजरा; सरकार स्थिर- काँग्रेस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंकेतील तमिळांचा मुद्दा बुधवारी संसद आणि संसदेबाहेर बराच तापला. द्रमुकच्या पाच मंत्र्यांनी पंतप्रधानांना राजीनामा सोपवला. या दरम्यान द्रमुकच्या मागण्यावर विचार होत होता, त्यांनी अचानक राजीनामा का दिला हे समजत नाही, असे चिदंबरम यांनी सांगितले. या घडामोडीत भाजपने अविश्वास प्रस्ताव आणण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री अचानक सरकारच्या मदतीला धावून आल्याअसून तृणमूल काँग्रेसने युपीएला अनपेक्षितपणे पाठिंबा जाहीर केला आहे. द्रमुकच्या पाच मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची दोन टप्प्यात भेट घेतली. द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे पुत्र अझगिरी यांची पंतप्रधानांची स्वतंत्र भेट बंडाच्या रूपात पाहिली जात आहे. पाठिंबा काढून घेताना अझगिरी यांचे मत विचारात घेतले नसल्याने ते नाराज असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. द्रमुकचा सहकारी पक्ष व्हीसीकेनेही पाठिंबा काढून घेतला आहे. पक्षाचे एकमेव खासदार थिरुमा क्लवन थोल यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना बुधवारी यासंदर्भात पत्र दिले. या संपूर्ण घटनाक्रमात चिदंबरम, कमलनाथ आणि मनीष तिवारी या तीन मंत्र्यांनी सरकारला धोका नसल्याचा निर्वाळा दिला.

तृणमूल सरकारच्या मदतीला- तमिळांच्या मुद्दय़ावर तृणमूल कॉँग्रेसने सरकारला पाठिंबा दिला आहे. हा मुद्दा संवेदनशील आहे. मात्र, परराष्ट्र धोरणावर पक्ष सुरुवातीपासून केंद्राला पाठिंबा देत आला आहे. त्यामुळे यावेळीही त्यात बदल होणार नाही, असे तृणमूलने म्हटले आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी आपला पक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देत राहील असे सांगितले.

भाजपचा अविश्वास नाही- संकटात सापडलेल्या सरकारवर भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा भाजपचा कोणताही विचार नाही. त्याची आवश्यकताही नाही. सरकारने लोकांचा विश्वास गमावला असून ते स्वत:हून कोसळेल.

द्रमुक महिला खासदार बेशुद्ध- द्रमुक खासदार वासंती स्टेनली बुधवारी राज्यसभेत र्शीलंकेच्या मुद्दय़ावर विरोध करताना बेशुद्ध होऊन पडल्या. यानंतर पीठासीन अध्यक्ष रेणुका चौधरी यांनी तत्काळ कामकाज स्थगित केले. वासंती काही क्षणात शुद्धीवर आल्या.