आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DMK's Vaiko Protests Against Rajapaksa, Detained For Defying Prohibitory Orders

मोदींच्या शपथविधीआधी एनडीएचा मित्रपक्ष रस्त्यावर, वायको यांची राजपक्षेंविरोधात निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभातील उपस्थिती विरोधात सोमवारी राजधानीत जंतर मंतरवर निदर्शने केली. निदर्शकांनी संसद रस्त्यावर श्रीलंकेचा राष्ट्रध्वज व राजपक्षे यांचे पोस्टर जाळले. पोलिसांनी या प्रकरणी वायको यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महिंदा राजपक्षे यांचे सोमवारी सकाळी येथे आगमन झाले.
आपल्या सर्मथकांसमोर बोलताना वायको म्हणाले, राजपक्षे यांची उपस्थिती म्हणजे नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाच्या पावित्र्याचा भंग ठरेल. राजपक्षे यांनी श्रीलंकेतील तमिळांचा नरसंहार केल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीलंकन तमिळांचा रक्तपात करणारे राजपक्षे यांना का बोलावण्यात आले? श्रीलंकेच्या मुद्दय़ावर एनडीएने यूपीएचा मार्ग अवलंबू नये, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही इथे शपथविधी समारंभाला विरोध करण्यासाठी आलो नाहीत. मोदी यांनी देशाला अत्युच्च शिखरावर नेण्यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. निदर्शनादरम्यान वायको आणि त्यांच्या सर्मथकांना स्थानबद्ध करण्यात आले.
वाजपेयी, सिंग यांच्याकडून निमंत्रण नव्हते
त्याआधी वायको यांनी राजपक्षे यांच्या निमंत्रणावर नाराजी व्यक्त करत मोदी यांना पत्र पाठविले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभाला राजपक्षे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच मनमोहन सिंग यांनीही 2004 व 2009 मध्ये तसे निमंत्रण दिले नव्हते याची आठवण वायको यांनी या पत्रात केली आहे.