आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमओकडे तक्रारी नको : सरकारची सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारी अधिका-यांच्या पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) पोहोचणा-या वाढत्या तक्रारींवर नाराजी व्यक्त करत सरकारने अधिका-यांना अन्य कार्यालयाकडे तक्रारी पाठवण्याच्या सूचना केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकारी, कर्मचा-यांनी पंतप्रधान कार्यालय किंवा सचिवांकडे तक्रारी दिल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पर्सोनेल आणि प्रशिक्षण विभागाने दिला आहे. कर्मचा-यांनी नोकरीतील समस्यांच्या अनेक तक्रारी पीएमओकडे पाठवल्या आहेत. नोकरदारांव्यतिरिक्त युनियन्सच्या तक्रारी वाढल्या आहेत.