आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर राज्याच्या विशेष दर्जात फेरफार नको -मुख्यमंत्री मेहबूबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू- काश्मीर व तेथील नागरिकांना विशेष दर्जा देणारी तरतूद रद्द करण्याच्या चर्चेनंतर राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व ३५ अ बाबत पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या अजेंड्याशी कोणतीही तडजोड होणार नसल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मेहबूबा यांनी सांगितले. 

सर्वाेच्च न्यायालयात कलम ३५ अ विरोधातील  एका याचिकेवर सुनावणी सुरू आहे. हे कलम काश्मीरला स्थानिक रहिवाशांची व्याख्या निश्चित करण्याचा अधिकार देते. सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत कलम ३७० वर मत मागितले आहे.
बातम्या आणखी आहेत...