आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना यामुळे मिळत नाही रोज 2 जीबीपेक्षा जास्त डेटा; नियमामुळे त्यांनाच फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दूरसंचार कंपन्या सध्या ग्राहकांनी न वापरलेला डेटा पुढे वापरण्याची ऑफर देत आहेत. पण सामान्य स्पीडवर दररोज २ जीबीपेक्षा जास्त डेटा त्या देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
  
कंपन्या प्रचार करत असलेला ‘अनलिमिटेड प्लॅन’ही लिमिटेड आहे. डेटावरील या बंदीचे कारण म्हणजे ‘फेअर युसेज पॉलिसी.’ स्पेक्ट्रम मर्यादित असल्याने कंपन्यांची क्षमताही मर्यादित आहे. या मर्यादेत त्यांना वेगाने वाढणाऱ्या ग्राहकांना डेटा द्यायचा आहे. ही पॉलिसी नसल्याने काही ग्राहक जास्त डेटा वापरतात, इतर वंचित राहतात. त्यामुळे कंपन्यांनी २ जी, ३ जी व ४ जी स्पीडने डेटा ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. त्याला बँडविड्थ किंवा डेटा कॅप म्हणतात. या मर्यादेनंतर डेटा ट्रान्सफरचा दर एवढा कमी होतो की इंटरनेटचा वापर करणे कठीण होते.  

यात कंपन्यांचा काय फायदा?
- कंपनी जर प्रतिव्यक्ती डेटाचा वापर मर्यादित करत असेल तर जास्त ग्राहकांना चांगला लाभ होतो. त्यामुळे व्यवसायातही फायदा होईल.  
- मर्यादेनंतरही डेटा सामान्य गतीने मिळावा यासाठी ज्यांना खरोखर गरज आहे असे लोकच बुस्टर रिचार्ज करतील. त्यामुळे डेटाचा दुरुपयोग होणार नाही.
 
१० महिन्यांत ९ पट वाढला वापर  
डेटाचा वापर जून २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान ९ पट वाढला आहे. आधी दरमहा १५ कोटी जीबी डेटाचा वापर होता. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत तो १३० कोटी जीबी झाला. दर घटल्याचा हा परिणाम. या कालावधीत १ जीबी डेटाचा दर ११० रु. पर्यंत घसरला आहे. आधी महिन्याला २२५ रु. द्यावे लागत. आता फक्त ११६ रु. जिआेचे ग्राहक त्यासाठी १५ रुपयांपेक्षा कमी रक्कम देतात.  
बातम्या आणखी आहेत...