आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांचे शुल्क केंद्र सरकार ठरवणार, आरोग्य मंत्रालयाच्या हलचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉक्टरांकडून विविध आजारांच्या तपासणी आणि निदानासाठी वसूल करण्यात येणारे शुल्क आता केंद्र सरकार ठरवणार असून लवकरच त्यासंबंधीचा कायदा अमलात येणार आहे. यासाठी मेडिकल ट्रिटमेंट स्टँडर्ड प्रोटोकॉलच्या मसुद्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालय तयारी करत असून औद्योगिक संघटना फिक्कीसुद्धा यासाठी मदत करत आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक आजारासाठी डॉक्टरांच्या शुल्काची महत्तम सीमा निश्चित करण्यात येईल.

फिक्कीच्या मदतीने हा मसुदा तयार करण्यात येत असून आरोग्यसेवा महासंचालकांची (डीजीएचएस) टीम त्यासंबंधी चर्चा करणार आहे. हा मसुदा सर्व बाजूंनी योग्य वाटला तर देशभरात लागू करण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले. एकाच आजारासाठी देशातील विविध भागांत वेगवेगळे शुल्क लावण्यात येत असल्याची माहिती फिक्कीच्या आरोग्यसेवा समिती प्रमुख संगीता रेड्डी यांनी दिली.


तज्ज्ञ, सिव्हिल सोसायटी सदस्यांची मदत
0आरोग्य मंत्रालयाने शुल्क र्मयादा निश्चित करण्याची तयारी विविध संघटनांवर सोपवली आहे.
0रुग्णालये, तज्ज्ञ आणि सिव्हिल सोसायटी सदस्यांना सोबत घेऊन मसुदा तयार करण्यात येणार.
0 मोठे डॉक्टर अधिक, तर लहान डॉक्टर कमी शुल्क घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे मत.
0 लोकांना फायदा व्हावा यासाठी प्रत्येक आजारासाठी ठरावीक शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे.