आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 राज्यातील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 30% डिलिव्हरी सिझेरियन, बाळ-बाळांतीणसाठी धोकादायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात सिझेरियनने होणाऱ्या प्रसूतींची संख्या वेगाने वाढत आहे. पैशांसाठी डॉक्टर गर्भवतींना शस्त्रक्रियेचा सल्ला देतात हे त्याचे सर्वात मोठे कारण. हा प्रकार खिशासाठीच नव्हे तर होणारे मूल आणि आई या दोघांच्या प्रकृतीसाठीही धोकादायक आहे. अलीकडेच चेंज. ओआरपीवरील एका ऑनलाइन निवेदनावर सुमारे दीड लाख महिलांनी सिझेरियनच्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त करून त्याच्या नियमनाची मागणी केली होती, त्या वेळी महिलांचे हे दु:ख समोर आले.
 
 ‘दिव्य मराठी’शी याबाबत चर्चा करताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी म्हणाल्या की, सध्या सिझेरियन हा प्रकार सामान्य झाला आहे. फक्त सिझेरियनचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांची नावेही जाहीर करण्याच्या बाजूने आहोत. वैद्यकीय पेशाची कशी बदनामी यामुळे होत आहे हे जनतेला समजावे हा हेतू. अशा डॉक्टरपासून लोकांना वाचवण्यात मदत मिळेल.
 
दैनंदिन जीवनशैलीत झालेल्या बदलाशीही या मुद्द्याचा संबंध असावा, अशीही शक्यता आहे. पण रुग्णालयांत, विशेषत: खासगी रुग्णालयांत ज्या प्रमाणात सिझेरियन होत आहेत त्याचा संबंध सिझेरियनशी आहे, असे वाटत नाही.
 
 तो घोटाळ्याकडे अंगुलिनिर्देशही करतो. त्यामुळेच रुग्णालयांत होणारी सामान्य प्रसूती आणि सिझेरियन यांची प्रकरणे एकाच फलकावर वेगवेगळी दाखवणे रुग्णालयांना अनिवार्य करावे, असे आम्ही आरोग्य मंत्रालयाला सांगितले आहे.
 
सामान्य प्रसूती आणि सिझेरियनची आकडेवारी काय हे प्रसूतीसाठी येणाऱ्या कुटुंबीयांना माहिती व्हावी हा त्यामागील उद्देश. त्यानुसार प्रसूतीसाठी कुठे जायचे याचा निर्णय त्यांना घेता येईल. मेनका गांधी म्हणाल्या की, रुग्णालयांनी आपल्या संकेतस्थळावर ही माहिती द्यावी आणि शक्य असेल तर शासकीय संस्थांनीच स्वत: राज्य, विभागनिहाय पद्धतीने ते संकेतस्थळावर टाकावे, अशी आमची इच्छा आहे.
 
या प्रकरणी चर्चा केली असता भारतीय वैद्यकीय परिषदेच्या प्रमुख जयश्रीबेन मेहता म्हणाल्या की, आम्ही नियम तयार करत नाही. आम्ही नियामक प्राधिकरण आहोत. सरकार एखादा नियम बनवत असेल तर आम्ही त्यांची अंमलबजावणी निश्चित करतो.
 
मुंबईच्या सुवर्णा घोष यांच्या ऑनलाइन निवेदनामुळे हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्या म्हणाल्या की, माझेही सिझेरियन झाले आहे. त्याची वेदना मला ठाऊक आहे. रुग्णालयात प्रसूतीदरम्यान स्त्री किंवा तिचे कुटुंबीय डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, अशा स्थितीत असतात. मग तो योग्य असे की अयोग्य. सिझेरियन वेदनारहित आहे, ते  आवश्यक  आहे, असे खासगी रुग्णालयांत म्हटले जाते. तुम्ही त्याला मनाई करू शकत नाही अशी स्थिती असते. एवढेच नाही तर अनेक रुग्णालयं जेव्हा संबंधित फॉर्म भरतात तेव्हा स्त्री किंवा तिच्या कुटुंबियांनी सिझेरियनची निवड केली, असे त्यात लिहितात. रुग्णालयाच्याच सल्ल्याने ते केले जाते ही वस्तुस्थिती असते. 
 
त्यामुळे आम्ही एक मोहीम उघडली. रुग्णालयांत सिझेरियन आणि सामान्य प्रसूतीची किती प्रकरणे आहे हे रुग्णालयांनी सांगावे एवढीच आमची मागणी आहे. घोष म्हणाल्या की, हैदराबादच्या एका रुग्णालयाव्यतिरिक्त सीताराम भरतिया रुग्णालयाने त्याबाबत पुढाकार घेतला आहे. आम्ही त्यांचे आभार मानले. या मुद्द्याचा संबंध डॉक्टरांशी जोडू नये तर महिलांच्या हिताशी जोडावा, असे आम्हाला वाटते. हे महिलांशी संबंधित प्रकरण आहे. 
 
जयपूरच्या वरिष्ठ प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. नीलम बाफना यांनी सांगितले की, अनेकदा मुलांची स्थिती अशी असते की सिझेरियन प्रसूती करावीच लागले. सिझेरियन खूप जास्त आणि मुद्दाम केले जात आहे असे सरकारला वाटत असेल तर दोन्ही प्रसूतींचा (सिझेरियन आणि सामान्य) दर एकच ठेवावा. एखाद्या महिलेची पहिली प्रसूती सिझेरियनने झाली असेल तर दुसऱ्या वेळीही सिझेरियनवरच भर असतो. सिझेरियन जास्त होण्याचे तेही एक कारण आहे. खरे म्हणजे दुसरी प्रसूती सामान्यपणे होऊ शकते.
 
चंदिगडच्या ज्येष्ठ प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. निरलेप कौर यांनी सांगितले की, आजकालच्या युवती धोका आणि प्रसूतिकळा यांना घाबरतात. आजकाल एक किंवा दोन मुलेच असावीत असा ट्रेंड आहे. त्यामुळे महिला धोका पत्करत नाहीत आणि त्या सिझेरियनची निवड करतात. सरकारी रुग्णालये काही कारण असेल तरच सिझेरियन करतात. पण आजूबाजूच्या राज्यांतून चंदीगडच्या सरकारी रुग्णालयांत जास्त गर्भवती महिलांना रेफर केले जाते. कारण इतर राज्यांत डॉक्टर आणि उपकरणांची कमतरता आहे. केंद्र सरकारने जास्तीत जास्त डॉक्टरांना नोकरी द्यावी. चांगल्या खासगी रुग्णालयांनीही सामान्य किंवा सिझेरियन प्रसूतीच्या दरात जास्त फरक ठेवला नाही. काही रुग्णालये रुग्णांना लुटण्यासाठी सिझेरियनचे दर जास्त ठेवतात हेही खरेच. 
बातम्या आणखी आहेत...