आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Doctor Nandini Sharma BJP Candidate For Delhi Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO : या डॉक्टरही आहेत निवडणुकीच्या मैदानात, मोफत वाटतात औषधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवस सर्वच उमेदवारांनी जीव ओतून प्रचार केला. तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या मतदरासंघात मतदारांकडे धाव घेतली. त्याच उमेदवारांपैकी एक होत्या, दिल्लीच्या मालवीय नगरमधून निवडणूक लढवत असलेल्या, भाजप उमेदवार डॉक्टर नंदनी शर्मा. नंदनी यांनी 2012 दिल्लीत महापालिका निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
फोटो - प्रचारादरम्यान नंदनी शर्मा.

नंदनी या होमियोपॅथिक डॉक्टर आहेत. अनेक वर्षांपासून त्या नागरिकांना सहकार्य करत आहेत. डॉक्टर नंदनी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट नावाची त्यांची एक सामाजिक संस्थाही आहे. नंदनी यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले. तर वैद्यकीय शिक्षण जोधपूरमध्ये झाले. तेथेच त्यांनी पीएचडी केली. नंदनी यांचे पती उद्योगपती आहेत. त्यांचा विवाह 1999 मध्ये झाला होता.
नंदनी यांची ट्रस्ट
डॉक्टर असल्याने नंदनी महिला आणि लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी आणि मोफत औषधी वाटपाची शिबिरे आयोजित करतात. तसेच ब्रेस्ट कँसरसंबंधी जनजागृतीसाठी मोहीमही राबवतात. दर महिन्याला पोषण शिबिराचे आयोजनही त्या करतात.

नंदनी यांना मिळालेले पुरस्कार
2014 मध्ये एशियन होमियोपॅथिक लीगने अॅप्रिसिएशन अवॉर्डने सन्मानित केले.
2013 मध्ये दिल्ली होमियोपॅथी बोर्डाने जीवनगौरव पुरस्काराने गौरवले.
2013 मध्ये उन्नत भारत सेवाश्री पुरस्कार मिळाला.
1998 मध्ये डॉक्टर युद्धवीर सिंह पुरस्कार मिळाला.
पुढील स्लाइडवर पाहा, नंदनी यांच्या प्रचाराचे फोटो