नवी दिल्ली - एका समारंभात थापड मारल्याच्या तसेच प्रतिमाहनन केल्याच्या आरोपावरून गायक मिका सिंग याच्याविरोधात दाखल केलेला ५० लाखांचा मानहानीचा खटला एका डॉक्टरने मागे घेतला आहे. या दोघांमध्ये समेट झाला आहे.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजरानी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांत समेटाच्या अटी आणि शर्तींनुसार समेट झाला असल्याचे याचिकाकर्ते डॉक्टर श्रीकांत मिकाचे वकील यांनी न्यायालयाला कळवले आहे. याचिकाकर्त्याला आता हा खटला मागे घ्यायचा आहे. त्यामुळे हा खटला रद्द ठरवण्यात येत आहे. या प्रकरणाची सुनावणी ३ नोव्हेंबरला ठेवण्यात आली होती. न्यायालयाने ती रद्द केली. नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या परिषदेनिमित्त लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केली होती. त्या वेळी अमरिक सिंग ऊर्फ मिका याने थापड मारली, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.