आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ एप्रिल रोजी नरेंद्र मोदींवर हल्ल्याची शक्यता ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या दावेदारीवरून जेडी(यू)च्या निशाण्यावर असलेले नरेंद्र मोदी यांच्यांवर २४ एप्रिल रोजी प्राणघातक हल्ला होणार असल्याच्या एक ट्विटने सोशल मीडियामध्ये खळबळ उडवून दिली आहे.

पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिद्ध मधु किश्चर यांनी मोदींच्या जीविताला धोका आहे ? असे ट्विट केले आहे. त्यावर उलट-सूलट प्रतिक्रीया आल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले आहे. मोदी समर्थक आणि विकासशील समाज अध्ययन केंद्राच्या वरिष्ठ फेलो मधु किश्चर यांनी ट्विट केले की, 'मी केंद्र सरकारच्या काही वरिष्ठ अधिका-यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की, तिस्ता सेटलवाड किंवा काँग्रेस मोदींविरोधात एफआयआर दाखल करू शकले नाही तर, त्यांची हत्या होऊ शकते.'

या ट्विटचा रोख सरळसरळ गुजरातच्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याकडे होता. किश्चर यांनी हे ट्विट डिलीट केले आहे. तत्पूर्वी, मोठ्या प्रमाणात ते शेअर केले गेले आहे. २००२ च्या गुजरात दंगलींसाठी मोदीच जबाबदार असल्याचा आरोप सेटलवाड या सुरूवातीपासून करत आल्या आहेत.

या ट्विट आधी केरळमधील 'जनम' या स्थानिक वृत्तवाहिनीने २४ एप्रिल रोजी केरळ दौ-यावर येत असलेल्या मोदींवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गुप्तचर यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मोदींच्या दौ-यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात यावी असे त्या आदेशात म्हटले आहे. केरळ सरकारने आयजी दर्जाच्या अधिका-यांकडे सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे.