आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाम वादावर भारताला जापानचा पाठींबा, म्हणाला- स्थितित कोणताही बदल करू नये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीन सोबत सुरू असलेल्या डोकलाम वादावर आता जापानने भारताला सपोर्ट दिला आहे. जापानने म्हटले आहे की, कोणीही जबरदस्तीने सिमेतील यथास्तितीत बदल करणे योग्य नाही. सिक्कीम सेक्टरमध्ये भूटान ट्रायजंक्शनजवळ चीन एक रोड बनवत आहे. भारत आणि भूटानने चीनच्या या मार्गाला विरोध केला आहे. जवळपास दोन महिन्यांपासून भारत आणि चीन सैन्य या परिसरात समोरा-समोर ठाकले आहे. 

पंतप्रधान शिजो आबे संप्टेंबरमध्ये भारतात येणार...
वृत्तसंस्थेनुसार भारतातील जापानचे राजदूत केनजी हिरामात्सु यानी नवी दिल्ली येथे समोर आलेल्या या मुद्द्यावर जापानची भुमीका स्पष्ट केली आहे. केनजी भूटानमध्येही राजदूत आहेत. जापानने आपली ही भुमिका पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आबे हे 13 ते 15 सप्टेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर येणार आहेत.
 
केनजी म्हणाले की, डोकलाम हे भूटान आणि चीनमधील वादग्रस्त क्षेत्र आहे हे मान्य आहे आणि दोन्ही देश यावर चर्चाही करत आहेत. पण आम्हाला हे ही समजते की, भारताची भूटानसोबत एक टीट्री आहे आणि यामुळेच भारतीय सैन्य या परिसरात सज्ज आहे.
बातम्या आणखी आहेत...