आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तींचा, आम्ही शत्रू नाही; चिनी मीडियाचा नवा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-चीन सीमा वादावरील नवा व्हिडिओ समोर आला आहे. चीनचे मुखपत्र शिन्हुआ न्यूजने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. याआधी गेल्या आठवड्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भारताची खिल्ली उडवण्यात आली होती, तर नव्या व्हिडिओमधून थोडा संयम दाखवत डोकलाम वाद लवकरच सोडवण्याबद्दल सल्ला देण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये म्हटले आहे, 'आशिया हा चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तींचा आहे. आम्ही जन्मापासून एकमेकांचे शत्रू नाही. दोन्ही देशांना एक वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.' याआधी Seven Sins या शिर्षकाखाली तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भारताची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यात भारताच्या सात चूका सांगण्यात आल्या होत्या. 
 
नव्या व्हिडिओमध्ये काय... 
- नवा व्हिडिओ 1 मिनिट 35 सेकंदांचा आहे. यात एक अॅंकर म्हणतो, की डोकलाम मुद्दा हा स्ट्रॅटिजिक ट्रस्टच्या कमकुवतपणामुळे आणि रणनितीच्या दुरदृष्टीच्या आभावामुळे निर्माण झाला असावा. 
- व्हिडिओमध्ये दोन्ही देशांच्या वैभवशाली इतिहासाचे दाखले देत म्हटले आहे, की दोन्ही देश जन्मापासून शत्रू नाहीत. त्यामुळे भारताने चीनच्या भू-भागावरुन आपले सैन्य तत्काळ मागे घेतले पाहिजे. 
- सिक्कीममधील डोकलाम भागात भूतान ट्रायजंक्शनजवळ चीनला नवा रस्ता तयार करायचा आहे. भारत आणि भूतान त्याला विरोध करत आहे. जवळपास 3 महिन्यांपासून येथे भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांच्या आमने-सामने आहेत. 
 
व्हिडिओमधून इशाराही... 
- नव्या व्हिडिओमध्ये भारताला इशाराही देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की भारताने भविष्यातील हानीसाठी काळजी घेतली पाहिजे. भारत नेहमी म्हणत असतो की त्यांच्याकडे 2.7 अब्ज लोक शांततेत आणि सौहार्द्यपूर्ण वातावरणात राहातात, संयम ठेवला तर त्यांच्या नागरिकांना याचा फायदाच होईल. 
 
मागील व्हिडिओमध्ये काय होते... 
- याआधी 17 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात चीनने भारताची खिल्ली उडवली होती.  
 
व्हिडिओत सांगितल्या या 7 चुका
1- घुसखोरी 
2 - द्विपक्षीय कराराचे उल्लंघन 
3 - आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष
4 - खरे काय आणि खोटे काय याबद्दल संभ्रम निर्माण करणे 
5 - पीडितवरच आरोप करणे 
6 - छोट्या शेजाऱ्याचे अपहरण करणे 
7 - चुकीला जाणीवपूर्वक कवटाळून ठेवणे
 
भारताला एवढी चिंता का ? 
- चीनला डोकलाम भागात रस्ता निर्माण करायचा आहे. या रस्त्यामुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सध्याच्या स्थितीत मोठे बदल होण्याची भीती आहे. सर्वात मोठा धोका हा भारताच्या सुरक्षिततेचा आहे. ही भारताची सर्वात मोठी चिंता आहे. रस्ता निर्माण झाल्यास चिनी आर्मीच्या टप्प्यात भारत येईल. यामुळे पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा भारताचा कॉरिडोर चीनच्या टप्प्यात येईल. त्यामुळे डोकलाममधून भारत आपले सैन्य कोणत्याही अटीवर मागे घेण्यास तयार नाही. 
 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...