नवी दिल्ली- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस आज हिंदू सेनेच्या वतीने दिल्लीमध्ये काही खास पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदू सेनेने दिल्लीतील जंतर-मंतरवर ट्रम्प यांचे पोस्टर आणि बलून लावले आहेत. याआधीही गेल्या महिन्यात हिंदू सेनेने ट्रम्प यांच्या विजयासाठी पुजा केली होती. मुस्लिम दहशतवादाविरोधातील मसीहा असा उल्लेख हिंदू सेनेने ट्रम्प यांचा केला.
- हिंदू सेनेने वाढदिवसाच्या आयोजनाचे पोस्टरही लावले होते.
- या पोस्टरवर लिहीले होते की, ”14 जूनला दुपारी 12 वाजता जंतर मंतरवर ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आपण आमंत्रित आहात.”
- हिंदू सेनेने निमंत्रणात लिहीले की, ”आमच्या सोबत या आणि मानवतेचे रक्षक अमेरिकेचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार ट्रम्प यांचा जन्मदिवस साजरा करा.
मुस्लिमांना विरोध..
अमेरिकेत मुस्लिमविरोधी वक्तव्य करणा-या डोनाल्ड ट्रम्पचे हिंदू सेना समर्थन करते. यापूर्वीही ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेने पूजा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत नुकताच मुस्लिमांच्या प्रवेशाबाबतचा मुद्दा उचलला आहे. अमेरिकेच्या एलजीबीटी नाइट क्लबमध्ये गोळीबारानंतर त्यांनी मुस्लिमांच्या प्रवेश बंदीची मागणी केली. ट्रम्प यांनी शासनाच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी बराक ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पुढील स्लाइड्सवर फोटोंमध्ये पाहा, असा साजरा केला वाढदिवस..