आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांना शिक्षा ठोठावताना अनावश्यक दया दाखवू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुन्हेगारांना शिक्षा ठोठावताना अनावश्यक दया दाखवू नका, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना दिले आहेत. एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने केंद्रीय विद्यालयातील एका लिपिकास नोकरीवरून काढून टाकण्याचेही आदेश दिले. हा लिपिक सतत दारू पिऊन कामावर येत होता.

न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय व न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या पीठाने मेघालय उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला. उच्च न्यायालयाने वरिष्ठ लिपिकाला पुन्हा नोकरीवर ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याला शाळा व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा निकाल देताना न्यायालय म्हणाले की, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे शिस्तीचे गांभीर्य कमी झाले आहे.

या प्रकरणात लिपिक दारूच्या नशेत कामावर जात होता. सकाळी साडेअकराला एखादा कर्मचारी नशेत कामावर जात असेल तर ती गंभीर स्वरुपाची बेशिस्त आहे.