आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Doordarshan Again Caught In Gaffe, Shows Visuals Of Manmohan Singh Instead Of Narendra Modi News In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दूरदर्शन\'ची पुन्हा चूक, पंतप्रधान मोदींच्या ऐवजी दाखवले मनमोहन सिंगांचे व्हिज्युअल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पंतप्रधान पीएम मोदी यांचे न्‍यूयॉर्क येथील जॉन एफ कॅनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात अमेरिकन अधिकारी)
नवी दिल्‍ली- राष्ट्रीय वाहिनी 'दूरदर्शन'मधील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 'दूरदर्शन'वर गेल्या गुरुवारी (25 सप्टेंबर) प्रसारित करण्‍यात आलेल्या बातमीपत्रात देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे व्हिज्युअल दाखवण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 'दूरदर्शन'वर प्रसारित झालेल्या बातमीपत्रात ही चूक दिसून आली. बातमीपत्रात देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे व्हिज्युअल दाखवण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यानंतर प्रसारित झालेल्या बातमीपत्रातही पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचेच व्हिज्युअल दाखवले. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे 'दूरदर्शन'च्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच वारंवार होणार्‍या चुका टाळण्यासाठी 'मॉनिटरिंग सिस्‍टम' लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहितीही अधिकार्‍याने यावेळी दिली.

'दूरदर्शन'ने केलेली ही पहिलीच चूक नसून यापूर्वी भारत दौर्‍यावर आलेले चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (xi jinping) यांच्या नावाच्या उल्लेख स्पेलिंगप्रमाणे 'इलेवन जिनपिंग' असा केला होता. नंतर 'दूरदर्शन'च्या संबंधित निवेदकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.
तसेच दूरदर्शनच्या एका रिपोर्टरने जम्‍मू-काश्‍मीरमधील पूरस्थितीचे वृत्तांकन करताना 'अनंतनाग'च्या ऐवजी 'इस्लामाबाद' शब्द तर 'शंकराचार्य हिल' ऐवजी ‘सुलेमान हिल’ असा शब्दप्रयोग केला होता.