आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी किंवा नंतर केलेली मागणी हुंडाच सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लग्नापूर्वी किंवा नंतर केलेली मागणी हुंडाच मानली जाऊ शकते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीची जन्मठेप न्यायालयाने कायम ठेवली.
आरोपीने लग्नापूर्वी हुंड्याची मागणी केली नव्हती. नंतर ती करण्याचा प्रश्नच नव्हता, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. पण तो फेटाळताना न्यायमूर्ती एम. वाय. इक्बाल व पी. सी. घोष यांच्या खंडपीठाने म्हटले की, समाजात हुंड्याची कुप्रथा खोलवर रुजली आहे. त्यामुळे लग्नापूर्वी हुंड्याची मागणी करण्यात आली नाही हा युक्तिवाद पोकळ आहे.
केव्हाही केलेल्या मागणीला हुंडाच म्हटले जाऊ शकते. हा निर्णय देतानाच खंडपीठाने उत्तराखंडमधील भीम सिंह आणि त्याच्या कुटुंबियांची याचिका रद्द केली. कनिष्ठ न्यायालयाने भीम सिंहला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ती कायम ठेवली होती. भीम सिंहने या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

वर्षभरातच केली पत्नीची हत्या

आरोपी भीम सिंहचे १९९७ मध्ये प्रेमादेवीशी लग्न झाले होते. हुंडा न दिल्याने पतीसह सासरच्या लोकांकडून तिला टोमणे सहन करावे लागत होते. पुढे सप्टेंबरमध्ये विष देऊन तिची हत्या करण्यात आलीव नंतर तिला जाळण्यात आले.