आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Hamid Dabholkar Meet To Union Central Minister Rajnathsingh

जादूटोणा विरोधी कायदा देशव्यापी व्हावा; हमीद दाभोलकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश -2013 महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

डॉ. हमीद दाभोलकर आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि माधव बावगे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मंगळवारी भेट घेतली. शिवाय डॉ. दाभोलकरांच्या मारेकरांचा अद्याप शोध लावू न शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

हमीद दाभोलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या अंधश्रध्दा निर्मूलनाच्या लढ्याचा गृहमंत्री राजनाथ सिंग यांना इतिहास सांगितला. डॉ. दाभोलकरांचा दि. 20 आॅगस्ट 2013 रोजी खून करण्यात आला. मात्र, अद्यापही ओरापी मोकाट असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात सरकारला जादुटोणा विरोधी कायदा करावा लागला. या कायद्यासाठी महाराष्ट्रात त्यांनी अनेक वर्ष लढा दिला होता. या कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे तात्काळ नुकसान होणार होते अशांकडून डॉ. दाभोलकरांचा खून करविण्यात आल्याची शक्यता त्यांनी गृहमंत्र्यांकडे वर्तविली. राज्यात अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करताना त्यांना अनेकदा मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. डॉ. दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने सन्मानित केले असले तरी हा कायदा संपूर्ण देशात लागू होणे हीच डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरेल, अशी विनंती डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली.

दाभोलकर आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेऊन कर्नाटक व आसाममध्ये जादुटोणा विरोधी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी विनंती केली. आम आदीम पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांच्याशी या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तर उद्या बुधवारी अरविंद केजरीवाल व केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी भेटणार आहेत.

(फाइल फोटो: डॉ. हमीद दाभोलकर)