आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Harsh Vardhan News In Marathi, Union Health Minister,divya Marathi

सीट बेल्ट नसेल तर इंधनही नको, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीट बेल्ट न लावताच वाहन चालवणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवरही अशीच बंदी घालण्याची सूचनाही पत्रात करण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालय नवीन रस्ते सुरक्षा कायदा तयार करत आहे. त्यासंदर्भात विविध स्तरांतील व्यक्तींकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी त्यात आपल्या १८ सूचनांचा समावेश करण्याची विनंती केली आहे.