आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोहामुळे संस्कृती जिवंत राहते : नेमाडे, चर्चेस दिली साहित्य संमेलनाची उपमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिजनांची अभिरुची सर्वच क्षेत्रात वर्चस्व गाजवीत असते म्हणून विद्रोह निर्माण होतो. जितका विद्रोह वाढेल तेवढी संस्कृती जिवंत समजली जाते; ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी अनौपचारिक गप्पांतून त्यांच्या साहित्यिक वाटचालींचा प्रवास उलगडला.

डॉ. नेमाडे यांना नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉ. नेमाडे यांनी िदल्लीतील पत्रकारांशी अनाैपचािरक चर्चा केली. दिल्लीत मराठी माणसांशी बोलायला मिळत आहे याचा आनंद फार मोठा असल्याचे सांगत डॉ. नेमाडे यांनी या साहित्यिक चर्चेस साहित्य संमेलनाची उपमा दिली. साहित्य संमेलनात लोकांशी संवाद साधता येणे हेच महत्वाचे आहे, त्यामुळे आजचा हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी साहित्य संमेलन असल्याचे सांगत डॉ. नेमाडे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तर दिली. डॉ. नेमाडे यांच्यावर बालपणी झालेल्या साहित्यिक संस्कारापासून ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंतचा प्रवास कथन केला. साने गुरूजी, बालकवी, बहिणाबाई आणि महाराष्ट्रातील संतकवी हे आपले आवडते साहित्यिक असल्याचे सांगत देशीवादाबद्दलची भूमिकाही त्यांनी परखडपणे मांडली.
जळगाव जिल्हयातील सांगवी या जन्म गावातून झालेले साहित्य संस्कार मोलाचे मानत ‘कोसला’ या मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या कांदबरीतील पांडुरंग सांगवीकर या नायकाच्या माध्यमातून खेडेगावातील संस्काराशी चिकटून राहणारे पात्र आणि त्याची आजच्या काळातील साधर्म्य डॉ. नेमाडे यांनी समजून सांगितले. समिक्षेच्या प्रांतातील आपल्या अलवार लिखाणास पूरक ठरलेल्या पु.बा.भावे, अरुण कोल्हटकर, आबा बागुल, नारायण सुर्वे यांच्या लिखाणाचा आवर्जुन उल्लेख डॉ. नेमाडे यांनी केला. ग्रामीण व आधुनिक जीवनातील विसंगतीवर चपखल बोट ठेवणारे डॉ. नेमाडे, त्यांची कादंबरीकार, कवी, समीक्षक, देशीवादाचे प्रवर्तक, समीक्षक अशी विविध प्रांतातील मुक्त मुशाफीरी यावेळी दीड तास रंगलेल्या गप्पांतून सर्वांना अनुभवायला मिळाली.
..तर तुकारामही
जगभर पोहोचले असते

मराठी साहित्यातील बलस्थानांचे कौतूक करतानाच त्यांनी उणिवांवरही बोट ठेवले. म्हाईंभटांनी लिहीलेले लिळाचरित्र आणि संत तुकारामांचे अभंग हे मराठी साहित्यातील जागतिक दर्जाच्या साहित्यकृती असल्याचे त्यांनी सांगितले. ईस्ट इंडिया कंपनीमुळे शेक्सपियर जगभर पोहोचले जर आपण इंग्लडवर राज्य केले असते तर तुकारामही जगभर पोहचले असते असे ते म्हणाले.