आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव केंद्रीय समितीची आज बैठक,पंतप्रधानांची उपस्थितीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीची बैठक गुरुवारी होत आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांची ही समिती आपल्या पहिल्या बैठकीत विविध केंद्रीय मंत्रालयांच्या वतीने वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेईल. जयंती उत्सवाच्या दृष्टीने मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय, देशभर उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणे, डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, आिर्थक व राजकीय भूमिकेबाबत एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकरांविषयी विशेष धडा समावेश करणे, रेल्वे, एअर इंडियाच्या प्रवासी तिकिटांवर डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीसंबंधी विशेष संदेश प्रसिद्ध करणे, देशभर ठिकठिकाणी एकात्मता दौड आयोजित करणे असे उपक्रमही वर्षभरात राबवले जाणार आहेत. गुरुवारच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होईल. बैठकीला डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. सिद्धलिंगय्या, मिलिंद कांबळे, भिकू रामजी इदाते, राहूल बोधी यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री व सचिव उपस्थित राहतील.
संबंधित मंत्रालयांवरही काही जबाबदाऱ्या
{सामाजिक न्याय मंत्रालय : १४ एिप्रल हा दिवस राष्ट्रीय बंधुभाव / समरसता दिवस म्हणून साजरा करणे, राजधानीत १५, जनपथवर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणे, दिल्लीत अलीपूर रोडवर ज्या इमारतीत डॉ. आंबेडकर नोव्हेंबर १९५१ पासून वास्तव्यास होते ते राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने उभारणी करणे, निबंध स्पर्धा, सेमिनार आयोजित करणे इत्यादी.
{माहिती तंत्रज्ञान मंत्रालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करणे, विशेष प्रदर्शनांचे आयोजन करणे.
{अर्थ मंत्रालय : डॉ. आंबेडकरांवर विशेष नाणे काढणे.