आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकीरच्‍या 80 हजार तासांच्या टेपचा धांडोळा, 10 पथके लागली कामाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर भलेही वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकला क्लीन चिट दिली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्यापही चौकशी थांबवलेली नाही. केंद्र सरकार झाकीर नाईकचे प्रत्येक विधान व भाषण खंगाळून पहात आहे. झाकीर नाईकच्या भाषणाच्या ८० हजार तासांच्या टेपचा धांडोळा घेण्यासाठी १० पथके कामाला लागली आहेत.

भाषणे हजारोंच्या संख्येने असलेली झाकीर नाईकची भाषणे ही सुरक्षा संस्थांसमोरील सर्वाात मोठी अडचण आहे. काही वर्षांतच झाकीर नाईकची ८० हजाराहून अधिक भाषणे विविध माध्यमातून प्रसारित झाली आहेत. प्रत्येक टेप किमान एक तासाची आहे. त्या सर्वांच्या चौकशीसाठी डझनभर पथके तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे झाकीर नाईक सोमवारी आफ्रिकेतून भारतात परतणार होता मात्र तो किमान तीन महिने तरी भारतात परतणार नसल्याची माहिती आहे.
झाकीर नाईक प्रकरणात घाईने पावले उचलू नये. जी पावले उचलली जातील ती ठोस असली पाहिजे. सर्व साक्षी-पुरावे एवढे ठोस असावेत की त्याआधारे कारवाई करता आली पाहिजे. सरकारला बॅकफूटवर जाण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्या, असे कायदा मंत्रालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले आहे. त्यामुळे तपास पथके सर्व संशयास्पद टेपची आधी चौकशी करतील, त्यानंतर कायदेशीर सल्लामसलत करूनच पावले उचलली जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि भाजपला जेएनयू प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटते. जेएनयू प्रकरणात केंद्र सरकारचे हात चांगलेच पोळले होते. झाकीरविरोधात केलेल्या कारवाईवात साक्षी- पुराव्या अभावी त्याला न्यायालयातून दिलासा मिळाला तर सरकारसाठी ती राजकीय डोकेदुखी ठरेल,या भितीने सरकार ताकही फुंकून पित आहे.
आपलेच म्हणणे खोटे ठरवण्याचा झाकीरचा प्रयत्न
एका टेपमध्ये झाकीरने एका ओळीत काही गोष्टी म्हटल्या आहेत. दुसऱ्या ओळीत तो स्वत:च ते म्हणणे खोटे ठरवत आहे. त्यामुळे टेप हा ठोस पुरावा मानला जाऊ शकतो का, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. गरज पडल्यास झाकीर भारतात परतल्यावर त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...