आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत होणार डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा शुभारंभ करतील. सुमारे १.८५ एकर जमिनीवर या संग्रहालयाचे उत्तर दिल्लीतील अलिपूर रोडवर बांधकाम केले जाईल.

भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी २६, अलीपूर मार्गावरील याच ठिकाणच्या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला होता. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण आणि कार्य मांडले जाईल. शिवाय बोधिसत्त्व भीमज्योती, बोधिसत्त्व भीमस्तंभ, बोधिवृक्ष, महूतील भीम जन्मभूमी, नागपुरातील दीक्षाभूमी, राजगड आणि मुंबईतील चैत्यभूमीच्या प्रतिकृतीही ठेवल्या जातील. संग्रहालयात अाध्यात्मिक केंद्र, दृक््श्राव्य थिएटर आणि माहिती केंद्राचीही स्थापना केली जाईल, अशी माहिती समाजकल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या संग्रहालयाच्या रचनेला दिल्ली महानगरपालिकेने आधीच मंजुरी दिलेली आहे. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र बांधून पूर्ण करणार आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात जनपथ मार्गावर याची कोनशिला ठेवण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त यंदा वर्षभर केंद्र सरकारकडून नवनवीन योजना आणल्या जाणार आहेत.

बाबासाहेबांच्या जीवनावरील संकेतस्थळ
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची महती विशद करणारे संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. www.DrAmbedkarwritings.gov.in नामक या संकेतस्थळावर बाबासाहेबांनी केलेली कार्ये आणि अन्य माहिती मराठी व इंग्रजीत उपलब्ध करून दिली जातील. शिवाय हिंदी, उर्दू, पंजाबी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, गुजराती आणि ओडियात भाषांतरही केले जाईल. या संकेतस्थळाचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात होईल.