आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाॅप - १०० विद्यापीठांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ८७ व्या स्थानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीयमनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच देशातील टॉप १०० विद्यापीठांची यादी जारी केली आहे. त्यात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाला ८७ वे स्थान (५०.०७ गुण) मिळाले आहेत. अभियांत्रिकीत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९७वे स्थान (४९.५१ गुण) मिळाले. नांदेडच्या गुरू गाेविंदसिंहजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्थेला ८९ वे (५०.६४ गुण) स्थान मिळाले. विशेष म्हणजे टॉप-१०० विद्यापीठांत पुणे-मुंबईच्या विद्यापीठांना स्थान मिळालेले नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) उपक्रमांतर्गत ही क्रमवारी जारी झाली. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विद्यापीठ औषधनिर्माणाशी संबंधित देशातील अव्वल संस्थांना क्रमवारी देण्यात आली.