आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS ला भारताबद्दल सर्वकाही माहित, दहशतावद्यांच्या तावडीतून 18 महिन्यांनी सुटलेल्या डॉक्टरने सांगितले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. कोसानम यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. - Divya Marathi
डॉ. कोसानम यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
नवी दिल्ली - लीबियामध्ये आयएसआयएसने डांबून ठेवलेल्या 6 भारतीयांची सुटका झाली असून त्यातील डॉ. राममूर्ती कोसानम यांनी भारतात आल्यानंतर आपबीती सांगितली आहे. ते म्हणाले, आयएसआयएस दहशतवाद्यांनी मला तीनवेळा गोळी मारली. मला रोज शिवीगाळ केली जात होती. तिथे असलेले तरुण दहशतवादी हे उच्चशिक्षित आहे. त्यांना भारताबद्दल बरीच माहिती आहे. डॉ. राममूर्ति यांना दहशतवाद्यांनी 18 महिने डांबून ठेवले होते. 
 
- डॉ. राममूर्ती म्हणाले, 'दहशतवाद्यांना माहित होते की मी डॉक्टर आहे आणि एक ना एक दिवस त्यांच्या कामी येऊ शकतो. त्यामुळेच कदाचित त्यांनी मला जिवंत ठेवले होते.'
- ऑपरेशन करण्यासाठी ते माझ्यावर दबाव टाकत होते. मात्र मी एक टाकाही लावला नाही. 
- राममूर्ती म्हणाले, गेल्यावर्षी रमजानमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हवा होता. मी वयाचे कारण पुढे करत त्यांना नकार दिला होता. 
- डॉ. कोसनाम म्हणाले, मी त्यांना सांगितले की मी औषधीने उपचार करतो. सर्जरी मला जमत नाही. मी सर्जन नाही. त्यानंतरही त्यांनी मला सिर्ते येथील हॉस्पिटलमध्ये पाठवले. 
- कँपमध्ये 10 दिवस काम करत असताना माझ्या एका खांद्यात आणि दोन्ही पायात गोळ्या मारल्या. तीनवेळा माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तिथे मी 3 महिने आयसीयूमध्ये होते. तोपर्यंत मिलिटरी अॅक्टिव्ह झाली होती. 
- एक दिवस मिलिटरी आमच्या बिल्डिंगजवळ आली. आम्ही चार लोक तिथे होतो. आम्ही आमच्या मुक्ततेसाठी ओरडू लागलो. त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला आणि आमची सुटका झाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...