आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीआयला विरोध केल्यानेच डीआरडीओ प्रमुखांची गच्छंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘अग्नी मॅन' नावाने ओळखल्या जाणा-या अविनाश चंदर यांना संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अध्यक्षपदावरून का हटवण्यात आली याची कारणे बाहेर आली आहेत. संरक्षण क्षेत्रात एफडीआय आणण्याला चंदर यांचा विरोध होता. त्यामुळे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्यावर नाराज होते, तर संरक्षण प्रकल्पांत विलंब होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाराजीही त्यांनी ओढवून घेतली होती. त्यामुळे चंदर यांना ३१ महिने आधीच हटवण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदर यांनी संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितले होते की, रडार व क्षेपणास्त्राशी संबंधित प्रकल्प पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल. तोपर्यंत सरकारने एफडीआयचा निर्णय थांबवावा. काही माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तानुसार त्यांच्या या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होते. कारण डीआरडीओचे अनेक प्रकल्प रखडले आहेतत. याच कारणांमुळे दोन दिवसांपूर्वी अचानक चंदर यांचा सेवा करार कमी करून
३१ जानेवारीपर्यंत करण्यात आला. यूपीए -२ सरकारच्या काळात जून २०१३ मध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले होते.

२९ हजार कोटींचा फटका
डीआरडीओचे अनेक प्रकल्प लटकल्याने पंतप्रधान नाराज होते. पीएमओने केलेल्या आकलनानुसार डीआरडीओचे प्रकल्प रखडल्याने सुमारे २९ हजार कोटी रुपयांचे नुकसार होणार होते. उदाहरणार्थ स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरिअर आता १९,३४१ कोटी रुपये असेल. प्रकल्प सुरू झाला होता त्या वेळी ते ३,२४१ कोटी रुपये होती. इतर अनेक प्रकल्पांच्या किमतीही
अशाच प्रकारे वाढल्या आहेत. स्टेल्थ गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर ३,८५० कोटींऐवजी ११,६६२ कोटींवर गेली आहे. हे प्रकल्प २०१०-११ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता ते २०१५-१६ पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

मी हटवले, कुणी तरी तरुण पदावर येईल : पर्रीकर
या प्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सांगितले की, मी त्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून या पदावर एखादी तरुण व्यक्ती नियुक्त होऊ शकेल. या पदावर एखाद्याला काँट्रॅक्टवर ठेवले जावे, असे आपल्याला वाटत नाही.

६२ वर्षीय बसू यांच्या नेमणुकीची चर्चा
डीआरडीओच्या प्रमुख पदासाठी भाभा अणु संशोधन केंद्राचे प्रमुख ६२ वर्षीय शेखर बसू यांचे नाव आघाडीवर आहे, तर चंदर हे ६४ वर्षांचे होते. त्यामुळे पर्रीकरांचा युक्तिवाद पटत नाही. अर्थात सरकारने नव्या नियुक्तीबाबत काहीच सांगितलेले नाही.

हे प्रकल्प लटकले
१.लाइफ कॉम्बॅक्ट एअरक्रॉफ्ट टप्पा -२
२.जमिनीवरून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
३.एअरो इंजिन कावेरी, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम,
४.नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट टप्पा - १
५.हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असणारे सक्षम क्षेपणास्त्र व अॅडव्हान्स लाइट टोडा एरेस सोनरास (एएलटीएस)