आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात अवर्षणाची चिन्हे आतापासूनच, मराठवाड्यात फक्त 19.2 मि.मी. पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात अवर्षणाची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत वरुणराजा 45 टक्के कमी बरसला. मराठवाड्यात तर सरासरीच्या 74 टक्के कमी म्हणजेच केवळ 19.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्यानुसार, देशात मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात सरासरी 43.4 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. देशात 1 ते 17 जून या कालावधीत सरासरी 78.8 मिमी पाऊस नोंदवला जात असतो.

राज्यातील पाऊस
०कोकण - गोवा : 193.9 मिमी. सरासरीच्या 35 टक्के कमी.
०मध्य महाराष्ट्र : 33.5 मिमी पाऊस. सरासरीच्या 53 टक्के कमी.
०विदर्भ : 47.1 टक्के पाऊस. सरासरीच्या 26 टक्के कमी.