आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी विवाह खोळंबले; खासदाराची लोकसभेत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ओडिशातील साधारण आठ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईमुळे लोक मुलींचे लग्न करण्यास धजावत नसल्याची माहिती बिजद खासदाराने बुधवारी लोकसभेत दिली. बालासोर मतदारसंघाचे खासदार रबींद्र जेना म्हणाले, या भागात पाण्याची एवढी गंभीर स्थिती आहे की जमिनीत हजार फूट खोलीपर्यंत खोदल्यानंतरही पाणी मिळत नाही. संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली भेट घेऊन पाणीसमस्येमुळे अन्य गावातील लोक त्यांच्या गावात मुली देण्यास तयार होत नसल्याची माहिती दिली. अशा स्थितीत मी असहाय आहे, असे जेना यांनी शून्य प्रहरात उपस्थित केलेल्या मुद्द्यात म्हटले आहे.

पाण्यासारखा मौल्यवान नैसर्गिक स्रोत सर्वांना उपलब्ध व्हावा यासाठी हा घटक राज्याऐवजी घटनेच्या समवर्ती सूचीत समाविष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आपला मतदारसंघ लष्कराच्या जमिनीने तिन्ही बाजूंनी वेढलेला आहे. त्यामुळे पाण्यासाठी अनेक किमी पायपीट करावी लागते. लष्कराच्या जमिनीचा वापर करण्याबाबत काही गावकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर रस्ता वापरावर बंधने घालण्यात आली आहेत. पाकिस्तान घुसखोरांना पाठवत असताना आपण त्यांच्या नागरिकांना वाघा सीमेवरून भारतात प्रवेश देतो.

दुसरीकडे आपल्याच देशातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घातली जात असल्याचे बारणे यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. खासदार प्रीतम मुुंडे यांनी मराठवाड्यासाठी पासपोर्ट कार्यालयाची मागणी केली. त्यामुळे लोकसभेत मराठवाड्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात यश मिळाले आहे.
बातम्या आणखी आहेत...