आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Possibility Increased As India Will Get Deficient Monsoon.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यावर्षीही देशावर दुष्काळाची छाया, सरासरी 88 टक्के पाऊस होण्याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठीच एक वाईट बातमी आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी केवळ 88 टक्के पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने याआधी देशात सरासरी 93 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. म्हणजेच सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आतापासूनच कमी पावसाचे संकेत
यावर्षी आतापासूनच कमी पाऊस होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास आधीच उशीर झाला आहे. आता असे सांगितले जात आहे की, चार किंवा पाच जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार आहे. 30 मेपर्यंत मान्सून देशाच्या दक्षिण-पश्चिम समुद्र किनाऱ्यापुढे सरकेल असे हवमान विभागाने आधी सांगितले होते.

दुष्काळ आहे हे कसे समजणार?
जेव्हा सरासरीच्या तुलनेत 90 टक्क्यापेक्षा कमी पाऊस होत असतो, त्यावेळी दुष्काळी स्थिती आहे असे म्हटले जाते.

कोणत्या भागांवर होणार अधिक परिणाम ?
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तर-पश्चिम म्हणजेच दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कमी पावसाचा सर्वाधिक परिणाम होईल.

पाऊस कमी होण्याचे कारण?
हवामान विभागाने याआधीच अल निनोमुळे पाऊस कमी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अल निनो ही एक अशी हवामानाची स्थिती असते जी प्रशांत महासागराच्या पूर्व भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या सागरी भागांत समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने निर्माण होते. त्यामुळे हवामानाचे चक्र बिघडते. त्यामुळे पुरासारखे नैसर्गिक संकट निर्माण होते. अल निनोची स्थिती दर 4 ते 12 वर्षांत निर्माण होते. गेल्या 65 वर्षात देशात 16 वर्ष अल निनोमुळे कमी पाऊस झाला होता.

गव्हानंतर, तांदळाचेही नुकसान?
कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात गहू आणि रब्बीच्या इतर पिकांचे नुकसान जाले होते. शेतकरी यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता कमी पावसाच्या अंदाजाने नवे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे तांदूळ आणि मक्यासारख्या खरीप पिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर महागाईचा आकडा आणखी वर जाऊ शकतो.