आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसपी हकच्या पत्नीने स्वीकारली नोकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या कुंडामध्ये हत्या झालेल्या डीएसपी जिया उल हक यांची पत्नी परवीन आझाद यांनी सोमवारी ओएसडीचा पदभार स्वीकारला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नियुक्तीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालक राजकुमार विश्वकर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. जिया उल हकचे भाऊ सोहराब यांनी पोलिसाची नोकरी स्वीकारण्यास नकार दिला आहे. 2 मार्चला हक व अन्य दोन गावकर्‍यांची हत्या झाली होती. घटनेनंतर परवीनने मुख्यमंत्री येईपर्यंत पतीच्या पार्थिवाला दफन करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर उपोषणही सुरू केले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अखिलेश यादव हक यांच्या देवरिया गावात गेले होते. सरकारकडून हक यांचे वडील, परवीन यांना सानुग्रह राशी म्हणून प्रत्येकी 25 लाखांचा धनादेश दिला होता. त्यानंतर परवीनला ओएसडी आणि हक यांचे बंधू सोहराबला वेलफेअर विभागात नियुक्त करण्यात आले होते.