आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी: डीटीएच सेवा, स्मार्टफोन हाेणार स्वस्त; वैद्यकीय उपकरणांच्याही किमती कमी हाेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात समान वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर केबल व डीटीएच सेवा स्वस्त होईल. स्मार्टफोन व वैद्यकीय उपकरणे, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक  म्हणजेच (आयुष) औषधांच्या किमती तसेच सिमेंटचा भाव कमी होईल. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी हे स्पष्ट केले.
 
सध्या केबल व डीटीएचवर १५% सेवाकरासह राज्यांचा करमणूक कर लावला जातो. तो १० ते ३० टक्क्यांपर्यंत जातो. जीएसटीमध्ये फक्त १८% एकच कर लागेल. चित्रपटांच्या तिकिटांवर सध्या सेवा करासह करमणूक कर लावला जातो. मंत्रालयानुसार, करमणूक कर राज्यांत १००%पर्यंत आहे. मात्र, जीएसटी केवळ २८% लावला जाईल.

सर्कस, थिएटर, क्लासिकल किंवा लोकनृत्य, नाटक यावरही १८% कर लागेल. सध्या राज्यांत या सर्वांवर कर लावला जातो. जीएसटीमध्ये २५० रुपयांपर्यंतची तिकिटे करमुक्त असतील. सेवा देणाऱ्यांना इनपूट टॅक्स क्रेडिटही मिळणार आहे.
 
देशभरात महापालिका किंवा पंचायतींच्या वतीने सध्या लावला जात असलेला करमणूक कर कायम राहील. जीएसटीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लावले जाणारे करच समाविष्ट करण्यात आले आहेत. स्थानिक संस्थांचे कर कायम राहतील.

पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘जीएसटी’मुळे अनेक वर्षे सरकारच्या महसुलात वाढ होणार नाही : फिच
 
बातम्या आणखी आहेत...