आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Non Areable Farmers Committed Suicide In Maharashtra Centre Government

नापिकीमुळे महाराष्ट्रात शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या - केंद्र सरकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नापिकी व अपुरा पाऊस यामुळे या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ८०० पेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी बहुतांश शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती सरकारतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या अहवालात ऑक्टोबर २०१४ पर्यंत राज्यात ७२४ शेतक-यांनी नापिकी, अपुरा पाऊस आदी कारणांमुळे आत्महत्या केल्या. महाराष्ट्रा खालोखाल तेलंगणा राज्यात ८४ शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केल्या. या दोन राज्यांनंतर कर्नाटक (१९) गुजरात आणि आंध प्रदेशात प्रत्येकी तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले की, कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकास व कल्याणाची जबाबदारी राज्यांवर आहे. शेतक-यांची स्थिती व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने लोकसहभागावर भर दिला जाणार आहे. शेती व शेतक-यांना स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी या व्यवसायात लोकसभाग वाढवणे, गट शेतीद्वारे ग्रामीण भागात सेवाविस्तार करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) नोंदीनुसार रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या सुमारे ११ हजार ७७२ लोकांनी गेल्या वर्षभरात मृत्यूला कवटाळले, अशी माहिती मंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.