आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dumping Or Spitting In River Ganga May Land You In Jail

सावधान! गंगेमध्ये थुंकल्यास किंवा कचरा फेकल्यास होणार तुरुंगवास, 10 हजार दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गंगा नदीच्या मुद्यावरून अनेक वचने दिलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारने आपली वचने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलण्याच्या विचारात आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने ठरवल्यानुसार नवी योजना प्रत्यक्षात आली तर, गंगेमध्ये अस्वच्छता पसरवणा-यांची खैर नसेल. नदीत कचरा फेकणे किंवा थुंकणे याला गुन्हा समजून त्यासाठी 10 दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. अन्यथा 10,000 रुपये पर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो. मोदींनी प्रचारामध्येही गंगेच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. निवडणुकीनंतर त्यांन गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला होता. गंगेला आईची उपमा देत त्यांनी वारंवार गंगेला 'मा' असे संबोधले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी गांभीर्याने पावले उचलण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री उमा भारती यांना दिली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वाराणसी आणि हरिद्वार येथे गंगेसंबंधी जागरुकता पसरवण्यासाठी एक तासाचा साऊंड शो आयोजित केला जाणार आहे. भारत सरकार गंगा नदीबरोबरच देशातील इतर नद्यांचा विकास आणि स्वच्छतेसाठी 90 दिवसांत विशेष योजना सादर करणार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले होते. या मुद्यावर पंतप्रधान विशेष लक्ष ठेऊन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही गंगा आणि हिमालयाचे संरक्षण करण्यासाठी सरकारच्या आगामी योजनांचा उल्लेख करण्यात आला होता.
पुढे पाहा गंगेच्या प्रदुषणाची काही छायाचित्रे...