आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duplicate Trains Will Run In Coming Festive Season Train Fare Lessen

आली डुप्लिकेट ट्रेन; तिकीट कन्फर्म नाही म्हणून थांबणार नाही प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. येणा-या सणांच्या काळात तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल, रेल्वेला खूप गर्दी असेल आणि या गर्दीत प्रवास करण्याची तुमची इच्छा नसेल तर काही हरकत नाही. ती रेल्वे सोडून द्या, तुमच्या प्रवासासाठी दुसरी रेल्वे तयार आहे. हे स्वप्न नाही तर, येणा-या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेने सुरु केलेली खास योजना आहे. रेल्वे अधिका-यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जास्तीत जास्त प्रवाशांचे तिकीट कन्फर्म करुन त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ही सुविधा असल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले आहे.

तुम्ही ज्या गाडीने प्रवास करणार आहात तिच्या नंतर पुढील 15 ते 30 मिनीटांमध्ये त्याच मार्गावर आणि स्टेशन दरम्यान दुसरी रेल्वे धावणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही असे प्रवासी या दुस-या गाडीने त्याच तिकीटावर आरामात प्रवास करु शकणार आहे. या रेल्वेला डुप्लिकेट ट्रेन असे रेल्वेकडून संबोधले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वेने प्रतिक्षायादीतील तिकीटावर प्रवास करण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सणांच्या काळात वाढत्या गर्दीमुळे रेल्वे विशेष गाड्या सुरु करीत असते. मात्र, या विशेष गाड्यांना वेळेचे बंधन असते की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थीती आहे. मात्र, नाईलाजास्तव प्रवाशी त्याने प्रवास करतात. त्यामुळेच रेल्वेने आता डुप्लिकेट ट्रेनची व्यवस्था केली आहे. नियमीत गाडीच्या वेळेवरच ही गाडी धावणार असल्यामुळे प्रवास वेळेवर होणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, घरपोच तिकीट सेवा