आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घर-कारसह सर्व कर्जांचे हप्ते भरण्यास 2 महिने सवलत, लग्नवाल्यांना कठोर नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटांच्या तुटवड्यामुळे ईएमआय भरू शकत नसलेल्या लोकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. १ नोव्हेंंबर ते ३१ डिसेंबर दरम्यानचा ईएमआय भरण्यासाठी ६० दिवसांची सवलत मिळेल. यादरम्यान तुम्ही ईएमआय भरू शकला नाहीत तरी तुमच्यावर बँक कोणतीही कारवाई करणार नाही.

ही सवलत एक कोटी रुपयांपर्यंतचे गृह, कार, कृषीसह सर्व प्रकारच्या कर्जांवर असेल. बिझनेस, पर्सनल, सिक्युअर्डसह सर्व कर्जे या योजनेत येतील. एक कोटी रुपयांपर्यंतच्या वर्किंग कॅपिटल खातेधारकांनाही सवलत मिळेल. सर्व बँका व बिगर बँकिंग संस्थांच्या कर्जांना ही सवलत असेल. सरकारने शेतकरी व व्यापाऱ्यांनाही दिलासा दिला आहे. आता शेतकरी ५०० च्या जुन्या नोटांवर बियाणे खरेदी करू शकतील. ओळखपत्र देऊन किसान केंद्रे व राज्य सरकारच्या विविध केंद्रांवर जुन्या नोटा चालतील. दुसरीकडे कॅश क्रेडिट (सीसी) आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना ५० हजारांपर्यंत रोख काढण्याची सवलत देण्यात आली आहे.

संसदेची दोन्ही सभागृहे चौथ्या दिवशी ठप्प
नोटबंदीच्या विरोधामुळे चौथ्या दिवशी संसद ठप्प झाली. राज्यसभेत पंतप्रधानांना बोलावण्याच्या मागणीवर विरोधकांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केली. गोंधळामुळे तिसऱ्या दिवशी लोकसभा ठप्प.

नोटबंदीवर दिल्लीत सुनावणी व्हावी : केंद्र
नोटबंदीवर देशभर दाखल याचिका दिल्लीत स्थलांतरित करा.सुनावणी सुप्रीम कोर्ट किंवा दिल्ली हायकोर्टाने करावी,अशी विनंती केंद्राने सुप्रीम कोर्टाला केली.कोर्ट २३ नोव्हेंबरला सुनावणी करेल.

दिव्यमराठी Q&A (भारत भूषण, एजीएम, स्टेट बँक ऑफ पटियाळा)
- २ महिन्यांचा हप्ता माफ झाला का?
नाही. कर्ज तर फेडावेच लागेल. फक्त नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता भरण्यासाठी ६० दिवसांपर्यंत सवलत मिळाली आहे.
- माझ्या हप्त्यावर परिणाम होईल?
असे समजा, तुमचा हप्ता १० नोव्हेंबरला देय होता. तो भरू शकला नाहीत तर ६० दिवस म्हणजे ९ जानेवारीपर्यंत भरू शकता. ३१ डिसेंबरला देय असेल तर तो २८ फेब्रुवारीपर्यंत भरू शकता.
-नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत पैसे जमा न झाल्यास जानेवारीत तारीख वाढेल?
सूट केवळ नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत आहे. जानेवारीपासून ठरलेल्या तारखेस हफ्ता भरावा लागेल. सवलतीच्या दाेन महिन्यांचा ईएमआय न भरल्यास जानेवारी व फेब्रुवारीत दोन-दोन हप्ते भरावे लागतील. पैसे असतील तर हप्ता भरलेला चांगला. अन्यथा,पुढच्या महिन्यात बोजा पडेल.
- जानेवारीत हप्ता भरू न शकल्यास माझे अकाउंट एनपीए होऊ शकते?
नाही. बँक चार हप्ते थकल्यानंतर अकाउंट एनपीए घोषित करते. सवलतीमुळे जानेवारीचा हप्ताही भरू शकला नाहीत तर तीन ईएमआय डिफॉल्ट धरले जाणार नाहीत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या दोन महिन्यांचे हप्ते थकले तर एनपीए घोषित करून बँकेची कारवाई.
- मी नॉन बँकिंग संस्थेकडून कर्ज घेतले आहे? मला या सवलतीचा फायदा मिळेल काय?
आरबीआयची ही सूट बँकांसोबत कर्ज देणाऱ्या दुसऱ्या नॉन बँकिंग वित्तीय संस्थांसाठीही लागू होईल.

पुढे वाचा, लग्नावाल्यांना कठोर नियम...
बातम्या आणखी आहेत...