आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी ई-दप्तर जुलैपासून; घरबसल्या वाचता येईल पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता कोणत्याही राज्याच्या शिक्षण मंडळाचे वाचता येईल तसेच ते डाऊनलोडही करता येणार आहे. ई-दप्तर पोर्टलवर सर्व राज्यांचे शिक्षण मंडळ आपली संपूर्ण पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करतील. केंद्रीय शिक्षण मंडळाची पुस्तकेही यात असतील. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार नाही, तर त्यांना मोफत डाऊनलोड करून पुस्तक वाचता येईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संबंधित दोन्ही पोर्टलची सुरुवात सरकार डिजिटल इंडिया प्रोग्रामअंतर्गत करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी ई-दप्तर आणि कैद्यांसाठी ई-तुरुंग या योजना एक ते सात जुलैपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या डिजिटल वीकदरम्यान लाँच केल्या जातील. या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि आयटी डिजिटल लॉकर, स्कॉलरशिप पोर्टल, ई-हॉस्पिटल, ई-प्रिझन, डिजिटाइज्ड इंडिया आदी साधारण एक डझन पोर्टलची सुरुवात होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...