आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Early Warning MSM Coming In Mobile , Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलवरून दिली जाणार आपत्तीसंबंधी माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक संकटानंतर मदत कार्यावर नजर ठेवणे आणि योग्य त्या सूचना देण्यात विलंब झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकार नागरिकांचा मोबाइल क्रमांक संग्रहित करेल. त्यावर संकटाची पूर्वसूचना देण्याची केंद्राची योजना आहे. गृहमंत्री आणि दूरसंचार मंत्रालय आपत्कालीन व्यवस्थापन कार्य योजनेवर काम करत आहेत.
संकटाचा अंदाज आल्यानंतर संबंधित जिल्हा प्रशासन लोकांना त्यांच्या मोबाइलवर त्याची सूचना देईल. त्यानुसार केंद्र आणि जिल्हा प्रशासन सातत्याने त्या मोबाइलवर हवामान बदलाची माहिती पोहोचवण्याचे काम करेल. केंद्रिकृत माहितीचा संग्रह आणि तंत्रज्ञानाची मदत मिळावी यासाठी दूरसंचार मंत्रालयाची मदत घेतली जाईल. यासंबंधी लवकरच राज्यांशी चर्चा केली जाणार आहे.