आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थ अवर मोहिम : वीज वापर कमी करा; प्रमाणपत्र मिळवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढवण्यासाठी प्रभावी विक्री तंत्राची देशाला गरज असून कारखान्यांनी कमी वीज वापर करून वीज बचत प्रमाणपत्र मिळवावे, असे मत वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रातील धुरिणांनी व्यक्त केले.

23 मार्चला रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत विजेचे दिवे बंद करून त्या दृष्टीने एक पाऊल टाकायचे असल्याचे आवाहन वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) केले आहे. सामाजिक-आर्थिक बदलाच्या या उपक्रमात दै. भास्कर व दिव्य मराठी समूह डब्ल्यूडब्ल्यूएफचा भागीदार आहे.

इतर विकसनशील देशांप्रमाणे भारताला ठोस ऊर्जा धोरण राबवावे लागणार आहे. त्याच हेतूने देशात नॅशनल मिशन फॉर एनहान्स्ड एनर्जी इफिशियन्सी (एनएमईईई) हे अभियान सुरू करण्यात आले. हवामानातील बदल रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आठ अभियानांपैकी एनएमईईई हे एक आहे. एनर्जी इफिशियन्सीच्या क्षेत्राला उत्तम मार्केटिंगची जोड देणे हा एनएमईईईचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारचे अभियान सुरू करणारे भारत हे पहिले विकसनशील राष्ट्र आहे. या अभियानाअंतर्गत पॅट आणि एमटीईई अशा दोन फ्लॅगशिप उघडण्यात आल्या आहेत. परफॉर्म, अचिव्ह अँड ट्रेडद्वारे (पॅट) 15 विविध औद्योगिक क्षेत्रांतील 478 कारखान्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांना 2015 पर्यंत विजेचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार या कंपन्यांना ऊर्जा बचत प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. जे कारखाने प्रमाणपत्र मिळवण्यात अयशस्वी ठरतील त्यांना दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

भारत जगात तिसरा- भारतात दरडोई विजेचा वापर आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढत आहे. ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. मात्र, दरडोई उत्पन्नात मात्र जगात भारत खूप खालच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अर्थ अवर मोहिमेत सहभागी होणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफने म्हटले आहे.