आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या शनिवारी ‘अर्थ अवर’ मोहीम; तासभर विजेचे दिवे बंद ठेवा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम रोखण्यासाठी 23 मार्चला रात्री तासभर दिवे बंद करण्याचे आवाहन वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्लयूएफ) केले आहे. या माहिमेला अर्थ अवर असे नाव देण्यात आले असून दैनिक भास्कर व दिव्य मराठी समूहासह देशातील अनेक संस्था, संघटना, व्यक्ती यात सहभागी होणार आहेत.

वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांचा वापर होतो. ते रोखण्याचा अर्थ अवर मोहिमेचा प्रमुख हेतू आहे. 23 मार्चला रात्री तासभर विजेचे दिवे बंद करून प्रतीकात्मक पद्धतीने या मोहिमेत व्यक्ती, संस्था, सरकारी कार्यालये, कंपन्या यांना सहभाग नोंदवता येणार आहे. जगभरात ग्रीन हाऊस वायूंचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस कार्बन उत्सर्जन, प्रदूषणात वाढ होत आहे. याचा त्रास हवामान बदलाच्या रूपाने सर्वांना जाणवतो आहे. ऊर्जेचा केवळ किफायतशाीर वापर करून हे थांबणार नाही, तर ऊर्जेच्या वापराचे मार्ग बदलणे भाग आहे. अर्थ अवर हे त्यादृष्टीने टाकलेले एक प्रतीकात्मक पाऊल आहे. पर्यावरणाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव व्यक्त करणारी ही मोहीम आहे. अक्षय ऊर्जेचा वापर असणारी उपकरणे वापरण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. संस्थात्मक पातळीवरही अक्षय ऊर्जेचा वापर व्हावा. सरकारनेही अक्षय ऊर्जेसाठी धोरणात्मक पावले उचलावीत एवढेच या मोहिमेतून अपेक्षित असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफने म्हटले आहे.

रात्री 8.30 ते 9.30 स्विच ऑफ - अर्थ अवर मोहीम 23 मार्च रोजी राबण्यात येईल. त्या रात्री 8.30 ते 9.30 तासभरासाठी विजेचे दिवे बंद करायचे आहेत. भारतातील प्रमुख शहरे, राष्ट्रपती भवन, गेट वे ऑफ इंडिया इंडिया गेट, सीएसटी (मुंबई), आरबीआय इमारत (मुंबई), देशातील ताज हॉटेल्स, आयटीसी हॉटेल्स आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

दिल्लीत सायकल रॅली - अर्थ अवर मोहिमेला पाठिंबा म्हणून नवी दिल्ली येथे 16 मार्च रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्तरातून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.