आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजवी दरात उपलब्ध व्हावी अपारंपरिक वीज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विजेचा कार्यक्षम वापर करणारी व अक्षय ऊज्रेची उपकरणे वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत डब्ल्यूडब्ल्यूएफने व्यक्त केले आहे. त्यासाठी मदत मिळण्याची आवश्यकता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केली आहे. इफिशिएंट एनर्जी मिशनअंतर्गत त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. शाश्वत विकासासाठी अक्षय ऊर्जा महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने 23 मार्चला रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत विजेचे दिवे बंद करून एक पाऊल टाकायचे असल्याचे आवाहन वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) केले आहे. सामाजिक-आर्थिक बदलाच्या या उपक्रमात भास्कर व दिव्य मराठी समूह डब्ल्यूडब्ल्यूएफचा भागीदार आहे.व्यक्ती, संस्था, संघटना यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्थ अवरमध्ये सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करायची आहे.

बहुमोलाची अक्षय ऊर्जा अल्प दरात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी एनर्जी सेव्हिंग कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऊर्जा मंत्रालयांतर्गत त्यासाठी एनर्जी इफिसिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी बाजारातील इतर कंपन्यांसह ऊज्रेचा कार्यक्षम वापर होण्यासाठी प्रयत्न करते आहे. वाजवी दरात कार्यक्षम वीज उपकरणे उपलब्ध करून देणे हे मुख्य ध्येय आहे. सर्वप्रथम कृषी व पालिका क्षेत्राचा यासाठी विचार होत आहे. या क्षेत्रात विजेचा कार्यक्षम व संतुलित वापर झाल्यास अनेक पट विजेची बचत होईल. त्यातून ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल यासारखे धोके कमी होतील, असे मत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केले.

मोहीम कशासाठी- कार्बन उत्सर्जन व ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनाला आळा बसण्यासाठी
- हवामान बदल या जागतिक समस्येची जाणीव करून देण्यासाठी
- पारंपरिक ऊर्जा निर्मितीतील नैसर्गिक साधनांचा नाश थांबवण्यासाठी
- सध्या भारतात ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा, गॅस आणि तेलाचा वापर केला जातो, हे टाळण्यासाठी
- इंधनासाठी आयातीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत कोळशाची आयात 50 दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. हे थांबवण्यासाठी
- अपारंपरिक स्रोतातून ऊर्जा निर्मिती वाढण्यासाठी अर्थ अवर हे पहिले पाऊल आहे.

सचिन, विद्या बालनचा सहभाग- डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अर्थ अवर मोहिमेत आतापर्यंत मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन, रितुपर्णा सेन, धनुष (तामिळ अभिनेता), अयान व अमान अली खान आणि रॉयल चॅलेंर्जस क्रिकेट संघाने सहभाग नोंदवला आहे. हायेस्ट लेव्हल सोशल मीडिया अँक्टिव्हिटी म्हणून 2012 मध्ये या मोहिमेची नोंद झाली.