आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार,भारताच्या अनेक राज्यांत भूकंप, जीवित नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांना बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. तथापि, जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही. रिश्टर मापकावर त्याची तीव्रता ६.८ मोजण्यात आली. हवामान खात्यानुसार संध्याकाळी ७.२५ला अालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेवर भूगर्भात १३४ किमीवर होता. दिल्ली, एनसीआर, कोलकाता, पाटणा, रांची आणि गुवाहाटीत भूकंपाच्या हादऱ्यांनंतर लोकांनी घराबाहेर पळ काढला. तथापि, भूकंपामुळे देशात कुठेही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही.
बातम्या आणखी आहेत...