आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारत भूकंपाने हादरला, अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत केंद्रबिंदू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/सुरत - दिल्ली, उत्तर भारतासह गुजरातला रविवारी ६.८ तीव्रतेच्या भूकंपचा झटका बसला. तथापि, यात प्राणहानी वा वित्तहानीचे वृत्त नाही. पाकिस्तानात मात्र तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतराजीत या भूकंपाचा केंद्रबिंदू हाेता. गुजराततेही ३.४ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला.
नांदवी गावात त्याचा केंद्रबिंदू होता. सुरत व तापी जिल्ह्यांना हादरे बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेचे प्रमुख जे.एल. गौतम यांनी सांगितले की, दुपारी ३.५८ वाजता आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत भूगर्भात १९० किमीवर होता. त्याचे हादरे पाकिस्तान, उत्तर भारतात जाणवले.